महामारीमुळे अर्थ मंत्रालयाकडून दिलासा

    border

    अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अप्रत्यक्ष करा बाबत काही घोषणा केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे…

    सेवा कर

    सेवाकरात सबका विश्वास (कायदेशीर वाद निराकरण) योजना २०१९ अंतर्गत अर्जदारास कर देयक (Tax Due) हे एस.व्ही.एल.डी.आर फॉर्म-०३ (SVLDR Form-03) इशू केल्यापासून तीस दिवसात भरावयाचे होते, ही मुदत सरकारने ३० जून २०२० पर्यंत वाढवली असून अर्जदारास यावर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.

    जीएसटी (GST) वस्तू व सेवा कर

    I) वस्तू व सेवा कराचे मार्च, एप्रिल व मे २०२० चे कर विवरणपत्र जीएसटीआर-०३ ब (GSTR-03B) भरण्याची मुदत ही ३० जून २०२० करण्यात आली आहे.

         ज्यांची उलाढाल ५ कोटीच्या आत आहे, त्यांनी जर ३० जून २०२० पर्यंत विवरणपत्र (मार्च, एप्रिल व मे २०२० चे) भरले तर त्यांनाकोणत्याही प्रकारचे व्याज, लेट फी व दंड भरावा लागणार नाही. इतर करदात्यांना व्याजाचा दर हा प्रति वर्ष ९% (जो सध्या १८% टक्के आहे) असा असेल.

    II) वस्तू व सेवा कराचे सण २०१८-१९ वर्षाचे वार्षिक विवरणपत्र (Annual Return) भरण्याची मुदत ३१ मार्च २०२० वरून ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    III) करदात्यास २०२०-२१ मध्ये वस्तू सेवा कर कायद्यानुसार जीएसटी कंपोझिशन स्कीम मध्ये जावयाचे असेल तर फॉर्म जीएसटी CMP-०३(GST CMP – 03) मध्ये अर्ज करावा लागेल हा अर्ज ३१ मार्च २०२० पर्यंत करावयाचा होता. ही मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

         तसेच या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२० या तिमाहीचे विवरणपत्र भरण्याची मुदत जूनच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत वाढवण्यात आली आहे.

    IV) वस्तू व सेवा कर अंतर्गत च्या नोटीस, नोटिफिकेशन, ऑर्डर, व अर्ज यांची मुदत जी २० मार्च २०२० ते २९ जून २०२० मध्ये आहे, ती ३० जून २०२० करण्यात आली आहे.      याबाबतचे परिपत्रके व कायद्याची तील बदल वस्तू व सेवा कराच्या जीएसटी कौन्सिल मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन करण्यात येतील.

    print

    Apr 14, 2020 - Blog - Team SSB



    Comments are closed.

    Archives
    error: Content is protected !!